Mahajyoti Military/Police Training Program 2026
NaukriJahirat.com
खाकी आणि वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी!!!
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता :
1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा असावी.
2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी.
3. इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा/असावी.
4. यापुर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेला असेल, अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही.
5. प्रशिक्षणाकरीता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परिक्षेद्वारे करण्यात येईल.
6. विद्यार्थ्यांची मिलिटरी / पोलिस भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
7. चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल.
8. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकनानुसार मेरीटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
9. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक अर्हता प्रशिक्षण संस्थेमार्फत तपासून रुजु करुन घेण्यात येईल.
वयोमर्यादा :
1) पोलिस भरती – 18 ते 29
प्रशिक्षणाचे स्वरूप :
1. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार मिलिटरी / पोलिस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येईल.
2. प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे असेल.
3. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरुपात देण्यात येईल.
4. प्रशिक्षण कालावधी 6 महिन्यांचा असेल.
आवश्यक कागदपत्रे :
1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र (Cast Certificate)
3. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
5. एस.एस.सी. उत्तीर्ण गुण पत्रिका/प्रमाणपत्र/उच्च शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
6. अनाथ असल्यास दाखला
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 जून 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2026 (11:55 PM)
ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? :
1. महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application for Competitive Training Program 2026-27” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत तपशीलात नमुद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन जोडावे.
3. विद्यार्थ्यांने अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे त्याशिवाय योजनेकरीता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही.
अटी व शर्ती :
1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 10/07/2026 राहील.
2. पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
4. प्रशिक्षणाकरीता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास प्रशिक्षण संस्थेत रुजु होतील त्या दिनांकापासुन त्यांना महाज्योतीच्या धोरणांनुसार विद्यावेतन लागू होईल तथापि प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्यांनाच विद्यावेतन देय राहिल.
5. कोणत्याही माध्यमातुन व अंतीम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांने यापूर्वी महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘सारथी ‘या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल.
6. विद्यार्थाचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
7. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योतीच्या Call Centre वर संपर्क करावा.
संपर्क क्र. – 0712-2870120/21
विद्यावेतन (Stipend) आणि उपस्थितीचे नियम (Stipend Policy & Attendance Rules) :
- ७५% बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य: जर तुमची वर्गातील उपस्थिती ७५% पेक्षा कमी असेल, तर तुमचे विद्यावेतन रोखले जाईल. त्यामुळे नियमितपणे वर्गात उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
- बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक: तुमचे विद्यावेतन थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यामुळे अर्ज भरताना तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी आणि चालू मोबाईल नंबरशी लिंक असल्याची खात्री करून घ्या.
अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या मोठ्या चुका (Common Mistakes to Avoid) :
- जुने किंवा अवैध नॉन-क्रिमिलेअर जोडणे: तुमचा नॉन-क्रिमिलेअर दाखला सध्याच्या चालू आर्थिक वर्षासाठी वैध असणे आवश्यक आहे. तो कालबाह्य (Expired) झालेला नसावा.
- आधी लाभ घेतलेला असल्यास पुन्हा अर्ज करणे: जर तुम्ही यापूर्वी महाज्योती किंवा ‘सारथी’ (SARTHI) संस्थेच्या कोणत्याही योजनेचा किंवा फ्री कोचिंगचा लाभ घेतला असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. असा अर्ज थेट बाद केला जाईल.
- अस्पष्ट कागदपत्रे अपलोड करणे: मोबाईलवरून घाईघाईत फोटो काढून कागदपत्रे अपलोड करू नका. सर्व कागदपत्रे (उदा. पदवी प्रमाणपत्र, जातीचा दाखला) स्कॅनर ॲपने स्पष्टपणे स्कॅन करूनच जोडा, जेणेकरून नाव आणि तारीख व्यवस्थित वाचता येईल.